RTE Admission 2026-27: आरटीई २५% मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज, जाणून घ्या पात्रता आणि कागदपत्रे!

आरटीई २५% मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

        नमस्कार मित्रांनो, 'आपला डिजिटल मित्र' मध्ये तुमचे स्वागत आहे. पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र शिक्षण विभागातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळते. आजच्या या पोस्टमध्ये आपण आरटीई प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत जाणून घेणार आहोत.



RTE २५% प्रवेश म्हणजे काय?

    शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE Act), खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५% जागा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. या जागांवर प्रवेश मिळणाऱ्या मुलांचे पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत असते.

RTE Admission साठी पात्रता (Eligibility):

१. रहिवाशी: अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 

२. वय: विद्यार्थ्याचे वय ६ वर्षांपेक्षा जास्त असावे (वयाची अट नर्सरी किंवा पहिलीसाठी वेगवेगळी असू शकते). 

३. उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी). 

४. सामाजिक प्रवर्ग: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची अट नसते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents):

अर्ज करताना खालील कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे:

  • निवासाचा पुरावा: रेशन कार्ड, आधार कार्ड, वीज बिल किंवा भाडे करार (Registered Rent Agreement).

  • जातीचे प्रमाणपत्र: जर आरक्षित वर्गातून अर्ज करत असाल तर.

  • उत्पन्नाचा दाखला: तहसीलदार कार्यालयाचा (१ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला).

  • जन्म दाखला: नगरपलिका/महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचा दाखला.

  • आधार कार्ड: विद्यार्थ्याचे आणि पालकांचे आधार कार्ड.

  • फोटो: विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो.

RTE Admission साठी अर्ज कसा करावा? (Step-by-Step Process):

    १. सर्वात आधी आरटीईच्या अधिकृत वेबसाईटला student.maharashtra.gov.in भेट द्या.

    २. तिथे 'Online Application' वर क्लिक करून नवीन नोंदणी (Registration) करा. 

    ३. नोंदणी केल्यावर तुम्हाला एक ID आणि Password मिळेल, त्याद्वारे लॉगीन करा

    ४. विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती, पालकांचा पत्ता आणि शाळांची निवड करा. 

    ५. अर्ज पूर्ण भरल्यानंतर तो सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा.


ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका!

टिप्पणी पोस्ट करा

Aapladigital Mitra Welcome to WhatsApp chat
Howdy! How can we help you today?
Type here...