रेशन कार्ड ई-केवायसी (Ration Card e-KYC) झाले की नाही? ऑनलाइन असे चेक करा फक्त २ मिनिटात!
नमस्कार मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी e-KYC करणे बंधनकारक केले आहे. जर तुमचे ई-केवायसी पूर्ण नसेल, तर तुमचे रेशन बंद होऊ शकते. पण तुमचे ई-केवायसी झाले आहे की नाही, हे घरबसल्या मोबाईलवर कसे पाहायचे? याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
रेशन कार्ड e-Kyc का आवश्यक आहे?
रेशन कार्डमधील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांनाच धान्य मिळावे यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये रेशन कार्डातील प्रत्येक सदस्याचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) केले जाते.
E-KYC STATUS ऑनलाइन कसे चेक करावे? (Step-by-Step)
तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
१. 'Mera Ration' App डाऊनलोड करा: सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील Google Play Store वर जा आणि 'Mera Ration' नावाचे अधिकृत सरकारी ॲप डाऊनलोड करा.
२. ॲप ओपन करा आणि भाषा निवडा: ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला हवी ती भाषा (मराठी/इंग्रजी/हिंदी) निवडा.
३. 'Aadhaar Seeding' पर्यायावर क्लिक करा: ॲपच्या होम स्क्रीनवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी 'Aadhaar Seeding' या पर्यायावर क्लिक करा.
४. रेशन कार्ड किंवा आधार नंबर टाका: आता तुमच्यासमोर दोन पर्याय येतील. तुम्ही तुमचा 'Ration Card Number' किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा 'Aadhaar Number' टाकून 'Submit' बटनावर क्लिक करा.
५. स्टेटस तपासा: सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक टेबल ओपन होईल. त्यामध्ये रेशन कार्डातील सर्व सदस्यांची नावे दिसतील.
ज्या नावापुढे 'Aadhaar Seeding: YES' असे लिहिले आहे, त्यांचे ई-केवायसी पूर्ण आहे.
ज्या नावापुढे 'Aadhaar Seeding: NO' असे दिसत आहे, त्यांना रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
जर e-kyc झाले नसेल तर काय करावे?
जर तुमच्या स्टेटसमध्ये 'NO' दिसत असेल, तर काळजी करू नका. तुमच्या जवळच्या रेशन दुकानात (FPS Shop) जा. तिथे तुमचा आधार नंबर देऊन 'Biometric' (अंगठ्याचा ठसा) द्या. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
महत्वाचे:-
वेळेवर ई-केवायसी पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमचे रेशन धान्य बंद होणार नाही. ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा!
%20copy.jpg)